ETV Bharat / city

छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले - आमदार विनायक मेटे - आमदार विनायक मेटे

आज मराठा क्रांती संघर्ष समितीतर्फे मराठा समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समन्वयक राजन घाग यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.

mla-vinayak-mete
mla-vinayak-mete
author img

By

Published : Jun 27, 2021, 7:09 PM IST

Updated : Jun 27, 2021, 7:20 PM IST

मुंबई - आज मराठा क्रांती संघर्ष समितीतर्फे मराठा समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समन्वयक राजन घाग यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या बाईक रॅलीमध्ये भाजपच्या आमदारांनी हजेरी लावलेली होती. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप सहयोगी पक्षाचे आमदार शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी या बाईक रॅलीला उपस्थिती दर्शवली होती.

बाईक रॅली सायन सोमय्या ग्राउंडपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत काढण्यात आली होती. या बाईक रॅलीमध्ये हजारो मराठा युवकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या दरम्यान मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था केली असल्यामुळे या बाईक रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या सर्व बाईक रॅलीनंतर शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करत टीका केलेली आहे.

आमदार विनायक मेटे

सर्वपक्षीय आमदारांची बैठक -

विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मुंबईमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून मराठा आरक्षण मिळण्यासाठी व इतर सोयी मिळवण्याकरता जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केलेले होते. या बाईक रॅलीला हजारोंच्या संख्येने मराठा युवक सहभागी झाले होते. मुंबईसारख्या शहरात या बाईक रॅलीला पोलिसांनी जे सहकार्य केलेले आहे. त्यासाठी आम्ही आभारी आहोत. मराठा आरक्षणा संदर्भात अधिवेशनात जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही महामोर्चा काढणार आहोत. हा महामोर्चा पूर्वनियोजित असेल. जर सरकारने अधिवेशनाच्या अगोदर काही निर्णय घेतले नाहीत तर 4 आणि 5 जुलैला मराठा समाजाच्या आमदारांची बैठक घेण्याच्या विचारात आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण देणार आहोत. मराठा समाजाची न्यायालयीन लढाई आणि राज्य सरकारची जबाबदारी या सगळ्या संदर्भात आम्ही विस्तृत पद्धतीने आमदारांना टिपणी देणार आहोत. हा प्रश्न राजकीय न करता या प्रश्नासाठी अधिवेशनामध्ये आपण आवाज उठवावा, यासाठी आग्रह करणार आहोत.

अधिवेशन नको असणारे भित्रे सरकार -

या सरकारला मुद्याचे काही देणेघेणे नाही. नाहीतर दोन दिवसांचे अधिवेशन घेतले नसते. मराठा समाजाकडे दुर्लक्ष, ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष, कोरोनाकाळात हॉस्पिटलमध्ये लूट सुरू आहे. या राज्य सरकारला चर्चा नकोय म्हणून हे अधिवेशन नकोय. हे सरकार भित्रे सरकार आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला आहे.

शाहू विचारांना तिलांजली -

सारथीच्या उपकेंद्राची सुरुवात कोल्हापूरमध्ये संभाजीराजांच्या हस्ते करण्यात आली. ही आनंदाची बाब आहे. मात्र यावर माझी नाराजी आहे. कारण, सारथीच्या उपकेंद्राची सगळ्यात जास्त गरज ही मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यासारख्या भागात आहे. कोल्हापूर सोबतच जर सर्व ठिकाणी सारथीच्या उपकेंद्राची सुरुवात झाली असती तर, ते खरंच छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक होण्यासारखे होतं. परंतु काल सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना त्यांच्याच जयंती दिनी तिलांजली देण्याचे काम केलेले आहे, असा टोला आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

Last Updated : Jun 27, 2021, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.