मुंबई - मानखुर्द देवनार येथील महाराष्ट्र नगरच्या बाजूचा रस्ता एमएमआरडीए प्रशासनाने बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एमएमआरडीएने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे मानखुर्दचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चिखलात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
एमएमआरडीए प्रशासनाने कारशेडच काम सुरू केले, त्यावेळी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप रस्ता दुरुस्त केला नाही. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असताना आबालवृद्धांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जोपर्यंत एमएमआरडीए प्रशासन रस्ता दुरुस्ती करत नाही तोपर्यंत चिखलात बसून आंदोलन सुरू राहील. अन्यथा पुन्हा एकदा एमएमआरडीएच्या मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा आमदार तुकाराम काते यांनी दिला आहे.