मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याचा विकास केवळ कागदावरच ( MLA Sanjay Shirsat on Marathwada development ) राहिला आहे. मात्र, आता मराठवाड्याचा ( MLA Sanjay Shirsat on funds for Marathwada ) अनुशेष राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याला नक्कीच न्याय देतील आणि त्यांनी सुरुवातही केली आहे, अशी प्रतिक्रिया ( Sanjay Shirsat on shivsena marathwada mla ) आमदार संजय शिरसाठ यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा - Deepak kesarkar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तक्रार केंद्र सरकारला करणार; दीपक केसरकर यांची माहिती
मराठवाड्याचा विकास हा गेल्या अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच होत आहे. प्रत्येक वेळेला मराठवाड्यासाठी निधीची तरतूद केली जाते, मात्र हा निधी खर्च न होता अन्यत्र वळवला जातो. त्यामुळे, मराठवाड्याचा अनुशेष कागदावर जरी पूर्ण दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र विकास झालेला नाही. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न, पायाभूत सुविधांचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे. मात्र, आता मराठवाड्याचा विकास नक्कीच गतिमान होईल, असा विश्वास आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील सर्व शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्या पाठीशी - मराठवाड्यातील शिवसेनेचे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून नेहमी त्यांच्या पाठीशी राहतील. एकनाथ शिंदे यांची निर्णय घेण्याची क्षमता अफाट आहे. त्यांनी सत्तेवर आल्यापासून मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्यामुळे, केवळ मराठवाड्याचा नाही तर ते महाराष्ट्राचा विकास करतील, अशी खात्री असल्यानेच आपण त्यांच्या सोबत राहू असेही शिरसाठ म्हणाले.
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार - गेल्या एक महिन्यापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आता एक दोन दिवसात होईल. कोणत्याही खात्याच्याबाबतीत हा विस्तार रखडला नव्हता तर केवळ काही तांत्रिक बाबींमुळे तो रखडला होता. आता त्या बाबी दूर होतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळात 50 आमदारांपैकी कुणाला स्थान मिळणार याचा आम्ही विचार करत नाही. मात्र, शिंदे यांनी जर एखादी जबाबदारी दिली तर ती नक्कीच पार पाडू, असेही शिरसाठ म्हणाले.
सुनावणीची भीती नाही - सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी होणार आहे. मात्र, या सुनावणीची आपल्याला भीती नाही, कारण सोळा आमदारांवर केलेली कारवाई ही चुकीचीच होती. त्यामुळे, आपल्यावर कोणत्याही पद्धतीची निलंबनाची कारवाई होणार नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.