मुंबई - बॉक्स ऑफिसवर सध्या ‘तान्हाजी’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. मात्र, या चित्रपटात दाखवलेल्या इतिहासासोबत छेडछाड करण्यात आल्याचाही आक्षेप काहींनी नोंदवला आहे. दरम्यान सैफ अली खानने एका मुलाखतीत बोलताना तान्हाजी हा ऐतिहासिक चित्रपट नाही. इंग्रज येण्याआधी भारत ही संकल्पना नव्हती, असे विधान केले.
हेही वाचा... साई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी
सैफ अली खानच्या त्या वक्तव्यावर आमदार राम कदम यांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेता सैफ अली खान याचे इतिहासबाबत ज्ञान कमी आहे. भारताचा इतिहास 1000 वर्षांपुर्वीचा असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'होय..! २०१४ ला महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न झाला होता'
सैफ अली खान एक चांगला अभिनेता आहे. तो इतिहासाचे अपूर्ण ज्ञान घेऊन बोलत आहेत. भारताचा इतिहास हजार वर्षांपूर्वीचा आहे. याची माहिती त्याला नसावी, असे राम कदम म्हणाले. त्याने राम राज्यापासून भारतीय इतिहासाची सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात येईल की जग भारत देशाला का मानत आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करून सैफ अली खान यांनी भारतीय इतिहासाला खाली दाखवत इंग्रजांना मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दुर्दैवच आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी दिलेली आहे.