मुंबई - हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होऊन दंगली व्हाव्यात असे वक्तव्य माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांच्याकडून केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कडून केला गेला. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईच्या आझाद मैदानात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 1993 च्या बॉम्ब ब्लास्टला जबाबदार असणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. दाऊद इब्राहिम सोबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे संबंध दिसून येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहोत.
यात हिंदू मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य कुठेच केली गेली नाही. याउलट दाऊदचा संबंध असणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा राज्य सरकार घेत नाही. दाऊद बद्दल राज्य सरकारला एवढच प्रेम असेल तर मंत्र्यांच्या कार्यालयात दाऊदचे फोटो लावावे. जमल्यास दाऊद इब्राहिमला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करावा असा चिमटा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी काढला आहे. मुंबई सायबर सेल कडून राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं. तसेच या मुद्द्यांवर पोलिसांना जी माहिती हवी असेल ती आम्ही पोलिसांना नक्की देऊ असंही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राज्य सरकार निर्माण करते
या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे सादर केले होते. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. आज त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी शासकीय निवासस्थानी पोलीस आले आहेत. मात्र त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलीस छावणीचे स्वरूप तयार करण्यात आले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार स्वतः करत आहे. त्यामुळे हे प्रकरण किती तानायचे याचा विचार राज्य सरकारने करावा असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.