ETV Bharat / city

'कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी पेंग्विनवर कोट्यवधींची उधळपट्टी?' नितेश राणेंचा महापौरांना सवाल - nitesh rane on penguin

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून पेंग्विनच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

mla nitesh rane
नितेश राणे
author img

By

Published : Sep 16, 2021, 8:30 PM IST

मुंबई - भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून पेंग्विनच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. पालिका कर्मचारी जर वाघाची देखभाल करू शकत असतील, तर मग पेंग्विनच्या देखभालीसाठी वेगळा खर्च का? असा खरमरीत सवाल आपल्या पत्रातून महापौर किशोरी पेडणेकर यांना नितेश राणे यांनी विचारला आहे.

letter
नितेश राणेंनी महापौरांना लिहिलेले पत्र
  • नितेश राणे यांचं महापौरांना लिहिलेलं पत्र -

आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे.

असो. आम्हीही समजू शकतो की पेंग्विनच्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ लाख ५७ हजार ०५९ होती. पण मागील दोन वर्षामध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला. आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीये. त्यामुळे तीन वर्षात सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे.

हेही वाचा - बँकांच्या एनपीए वसुली करता दोन कंपन्यांची स्थापना; 30,600 कोटीची केंद्र देणार हमी

मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हैं ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रुपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे. तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही.

letter
नितेश राणेंनी महापौरांना लिहिलेले पत्र

एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितल. पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करू शकतात तर पेंग्विनची का नाही? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी?

राणीची बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडिलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका पेंग्विनच्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.

इतकेच नाही तर, लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला. पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा.

हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.