मुंबई - पोलिसांच्या नाकाबंदीमुळे दहिसर चेक नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर मुंबईत हळूहळू काही उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये सुरु होत आहेत. मुंबई उपनगर, दहिसर, भाईंदर, ठाणे या भागातील शेकडो नागरिक कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेला जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या गाड्यांची संख्यादेखील वाढली आहे. पोलीस या सर्व गाड्यांची तपासणी करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आमदार मनीषा चौधरींनी आंदोलन केले.
राज्य सरकारच्यावतीने कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एकीकडे सरकारकडून दुकाने चालू करण्यासाठी सांगितले तर ऑफिस देखील 50 % उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सुविधा चालू करण्यात आली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे भाजपा आमदार मनीषा चोधरी यांनी दहिसर चेकनाका यांनी आंदोलन केले.