मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे वीज प्रश्नावर सरकार गंभीर नाही असे सांगत विधिमंडळाच्या (Maharashtra Winter session 2021) पायऱ्यांवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषिपंपाची तोंडणी, अवाजवी आलेले वीज बिल यासंदर्भात त्यांनी हे उपोषण केले. (MLA Mahesh Shinde Fast in the Assembly) सत्ताधारी पक्षाचा आमदार उपोषणाला बसल्याने त्याची चर्चा विधान भवनात सुरू होती. शेवटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतः येऊन महेश शिंदे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.
विजेच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात गोंधळ
कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे वीज प्रश्नावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले होते. त्यांच्या समर्थनासाठी शिवसेनेचे मुंबईचे आमदार प्रकाश सुर्वे हेसुद्धा त्यांच्या सोबत बसले. पूर्ण महाराष्ट्रात विजेचा प्रश्न पेटलेला असून या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असे (Energy Minister Nitin Raut MLA Mahesh Shinde Fast) आक्षेप या आमदारांनी घेतला होता. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्व ठिकाणी विजेचा खेळखंडोबा उडालेला आहे असे त्यांनी सांगितले. पण या उपोषणाची दखल घेत सत्ताधारी नेत्यांनी स्वतः येऊन महेश शिंदे यांना उपोषण मागे घ्यायला लावले. या प्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाडसुद्धा उपस्थित होते.
दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करणार
ऊर्जामंत्री व कृषिमंत्री यांना यापूर्वीही विजेच्या प्रश्नाबाबत सांगितले होते पण त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव मला उपोषणाला बसावे लागले असे महेश शिंदे म्हणाले. आजचे आश्वासन दिल्यानंतर जर पुन्हा या प्रकरणी सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही तर यापुढे समस्त शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा आंदोलन तीव्र करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - आदित्य ठाकरे धमकी प्रकरणी एसआयटी स्थापन करणार - गृहमंत्री