ETV Bharat / city

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेबसाईटवरून झाकीर नाईकचे नाव हटवा; आमदार अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी झाकीर नाईक याचे नाव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर असल्याबाबत आक्षेप घेतला आहे. आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार अतुल भातखळकर
आमदार अतुल भातखळकर
author img

By

Published : Oct 28, 2020, 3:13 PM IST

Updated : Oct 28, 2020, 3:20 PM IST

मुंबई - जिहादी व भामटा झाकीर नाईकची आठवण नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वेगळ्या अर्थाने जपल्याची टीका भाजप आमदार भातखलकर यांनी केली आहे. या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत झाकीर नाईक याचे नाव झळकत आहे. त्याचे नाव राज्य सरकारने तात्काळ हटवावे, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा त्यांनी इशारा दिला आहे.

भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी झाकीर नाईक याचे नाव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर असल्याबाबत आक्षेप घेतला आहे.

कोणा आहे झाकीर नाईक?

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, की दहशतवादी कारवायांत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे झाकीर नाईक हा आरोपी आहे. झाकीर हा चौकशी टाळण्यासाठी फरार झाला आहे. करोडो रुपयांची अफरातफर व हवाला रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बांग्लादेश, इंग्लंड यासह अनेक देशांमध्ये झाकीर नाईकला प्रवेश व ऑनलाइन भाषण देण्याससुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेबसाईटवरून झाकीर नाईकचे नाव हटवा

म्हणून आमदार भातखळकारंनी घेतला आक्षेप

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, की देशद्रोह्याचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे हे अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी बाब आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेबसाईटवरून झाकीर नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात पुढील २४ तासात कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला. आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक हा गेल्या काही वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्य करत आहे. त्याच्या वादग्रस्त भाषणांमुळे त्याच्यावर भारत सरकारने कारवाई केली होती.

Last Updated : Oct 28, 2020, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.