मुंबई - स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आतापर्यंत महिलांनी अनेक बाबतीत योगदान दिले आहे स्वातंत्र्य लढ्यात अरुणा असफल्ली यांच्यासारख्या अनेक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता महिला समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात तितक्याच ताकदीने आणि सक्रियपणे सहभागी होऊ शकतात हे महिलांनी वारंवार सिद्ध केले आहे मात्र जर आपण पाहिले तर गेल्या 75 वर्षात महिलांची झालेली प्रगती ही उल्लेखनीय आहे Neelam Gore Interview To ETV Bharat आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत मग त्या शिक्षणात असतील राजकारणात असतील समाजकारणात असतील की अन्य कोणत्याही क्षेत्रात असतील त्या अत्यंत धडाडीने आणि जिद्दीने काम करत आहेत असे मत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे त्या ईटीव्ही भारतशी बोलत होत्या
महिलांना लिंग समानता आणि सुरक्षितता महत्वाची समाजामध्ये आज महिलांनी अनेक क्षेत्रात जरी प्रगती केली असली तरी ही प्रगती संमिश्र स्वरूपाची आहे असे म्हणावे लागेल महिलांना आजही अनेक ठिकाणी जाणून बुजून डावलले जात आहे महिलांवर अन्याय आणि अत्याचार सुरूच आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे राज्याने शक्ती कायदा केला आहे मात्र या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणे ही तितकेच गरजेचे आहे त्याचप्रमाणे महिलांची लिंग समानता हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे महिलांची सुरक्षितता नेहमी जपली गेली पाहिजे असेही डॉक्टर गोरे म्हणाल्या
सैराट सारख्या घटनांना आळा घातला जावा राज्यात अनेकदा सैराट सारख्या घटना घडत आहेत यामध्ये लोकांची मानसिकता बदलणं जितकं गरजेचं आहे तितकंच कायदा सुव्यवस्था राखणे हेसुद्धा सरकारचे काम आहे अशा प्रवृत्ती बळावू नये आणि त्यांना शस्त्र मिळू नयेत यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे असेही डॉक्टर गोरे म्हणाल्या आहेत महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यावे त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची बंधने असू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्या म्हणाल्या आहेत
विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न सुटावेत राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन येत्या 17 तारखेपासून सुरू होत आहे हे पावसाळी अधिवेशन सहा दिवस चालणार आहे या सहा दिवसांमध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न सुटतील आणि जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय मिळेल सर्व आमदार हे सक्षम आहेत ते आपल्या विभागातील प्रश्न मांडतील आणि विरोधी पक्ष ही तितक्याच ताकदीने जनतेच्या भावना सभागृहात मांडेल असा विश्वास डॉक्टर गोरहे यांनी व्यक्त केला आहे
मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत बोलण्यास नकार राज्यात सरकार अस्तित्वात आले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाच खाते वाटप झालेले नाही त्यामुळे मंत्र्यांना खाती प्राप्त होऊन ते संबंधित प्रश्नाबाबत कधी अभ्यास करणार आणि जनतेच्या प्रश्नांना कसा न्याय मिळणार याबाबत विचारले असता डॉक्टर गोरे यांनी बोलण्यास नकार दिला पिठाची अधिकारी असल्याने अशा प्रश्नांना उत्तर देणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले
हेही वाचा - सरकार पाडण्यावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका