मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात. त्यावेळी 1984 साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात का ? असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
ही लोकशाही आहे. इथे कोणीही अमृत पिऊन सत्तेत बसत नाही हे फडणवीस यांना कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवारं हे देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदीसरकार सत्तेबाहेर जाईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
Miracles Happen When Fadnavis Criticizes : फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो, आम्ही 2024 मध्ये चमत्कार घडवू ! - Sharad Pawar's politics is over
"शरद पवार यांचे राजकारण संपले आहे" (Sharad Pawar's politics is over) असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले होते. त्यानंतर चमत्कार घडला (A miracle happened) आणि आता पुन्हा ते टिका करत आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे आम्ही 2024 मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.