मुंबई - एसटी कामगारांचे आंदोलन (st workers strike) भाजप चुकीच्या वळणावर नेत असल्याचे सांगतानाच एसटी कामगारांच्याबाबत सरकारच्या मनात नकारात्मक भूमिका नसल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik criticize bjp) यांनी दिली.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनापूर्वी पालिकेकडून स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण
एसटी कामगारांचा पगार (st workers) वाढावा, त्यांना बोनस मिळावा ही भूमिका सरकारची आहे. मात्र, या कामगारांना राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी केल्यास राज्याला पगार देण्यासाठी वेगळे कर्ज घ्यावे लागेल. मुळात निगम, मंडळ असेल किंवा मनपा असेल, या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे, कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची जबाबदारी त्यांचीच असते. जर यापैकी कुठलीही संस्था आर्थिक डबघाईला आली तर, राज्यसरकार अनुदान देत असते, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपला कामगारांची इतकी चिंता आहे तर, एअर इंडियाचे कर्मचारी असतील किंवा टेलिकॉम सेक्टरमधील कर्मचारी यांची जबाबदारी घेऊन मोदींच्या घराबाहेर आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे कारस्थान एसटी कामगारांच्या लक्षात येऊ लागल्याने ते कामावर रुजू होऊ लागले असल्याचेही नवाब मलिक (minister nawab malik) यांनी सांगितले.
कॉर्डिलिया क्रूज प्रकरण (cordelia cruise) दाबण्यासाठी एनसीबीची (NCB) गडबड सुरू
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण दाबण्यासाठी आता एनसीबीची (अमली पदार्थ विरोधी पथक) गडबड सुरू आहे. या प्रकरणाची तीन ठिकाणी चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांची एसआयटीही चौकशी करत आहे. सत्य परिस्थिती समोर येईलच, असे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले. तसेच, एनसीबीच्या चांडाळ चौकडीविरोधात हजारो कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. याविरुद्ध माझी लढाई आहे, एनसीबी विरोधात नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.
काशिफ खान (kashif khan) याचा नमस्क्रे नावाचा ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डचा पेपर एनसीबीने रेडमध्ये ताब्यात घेतला आहे. काशिफ खान सध्या गोव्यात आहे. रशियन माफीया इथून ड्रग्जचा व्यवसाय करतात. वानखेडे त्याला का वाचवत आहे. गोव्यात का रेड होत नाही. महाराष्ट्रातच का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला.
आता समीर वानखेडे गुजरातमधील लॅबवर विश्वास करत नाही. म्हणजे मोदींच्या राज्यातील लॅबवर समीर वानखेडे विश्वास का ठेवत नाही. गुजरातमधील मोरबीमध्ये ड्रग्ज पकडले गेले. पाकिस्तानमधून समुद्रमार्गाने गुजरातमध्ये ड्रग्ज येत आहे. हा खेळ गुजरातमधून सुरू आहे. समीर वानखेडे हे फर्जिवाडा करत आहेत, असा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला.