मुंबई - राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. काल (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
'आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज' - मुंबई मंत्री विजय वड्डेटीवार बातमी
मुंबईमध्ये मंत्रालयात असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षातून राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्यात.परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.