मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणले जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अभ्यासक्रमाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Face to Face Uday Samant ) यांनी ईटीव्ही भारतशी केलेली विशेष बातचीत.
Face to Face Uday Samant : '१५ फेब्रुवारीपर्यंत सर्व परीक्षा ऑनलाईनच घेणार' - maharashtra new education syllabus
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणले जाणार आहे. यानिमित्ताने शिक्षण पध्दतीत झालेल बदल, तसेच नवीन अभ्यासक्रम, एसटी संप (ST Workers Strike) अशा विविध मुद्दयांवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने 'फेस टू फेस' या सदराखाली चर्चा केली आहे.
Face to Face Uday Samant
मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणले जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अभ्यासक्रमाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Face to Face Uday Samant ) यांनी ईटीव्ही भारतशी केलेली विशेष बातचीत.
प्रश्न - कुलगुरुंच्या निवडीबाबत विद्यापीठ सुधारणा कायदा केल्यानंतर खूप मोठा वादंग निर्माण झाला याकडे कशा पद्धतीने पाहता ?
उदय सामंत - विद्यापीठ सुधारणा कायदा हा विधिमंडळामध्ये झाला. त्याला विधिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. मात्र, काही रोग ज्यांना आपल्याच लोकांची वर्णी लावायची होती. अशा लोकांचा या कायद्याला विरोध होता. तो विरोध आम्ही मोडून काढला आहे आणि पात्रतेप्रमाणे सर्वांची निवड होईल याची आम्ही काळजी घेत आहोत. सिमेंट मधील काही सदस्य हे एका विशिष्ट पक्षाचे होते आणि ते तसेच राहावे आपल्या काही गोष्टी झाकून ठेवण्यासाठी विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांचे सर्व पितळ आता उघड पडलेलं आहे. आणि सिमेंटमध्ये सुद्धा आता पात्रतेप्रमाणे निवड होईल.
प्रश्न - काही ठिकाणी आधीच खड्डे तयार झाले होते अशी माहिती आता समोर येते आहे ?
उदय सामंत - ही अतिशय खरी बाब आहे. काही लोकांनी आपल्या लोकांची वर्णी लावण्यासाठी विद्यापीठांचा सिनेट मंडळाचा वापर केला होता. मात्र, आता आम्ही समान संधी मंडळ निर्माण केले आहे. त्यामुळे मला सांगायला आनंद वाटेल की, पत्रकार आणि संपादक यांना सुद्धा सिनेट सदस्य म्हणून नेमणूक होऊ शकते. तसेच पद्म पुरस्कार विजेते असतील. डॉक्टरेट प्राप्त सामाजिक कार्यकर्ते असतील अशा सर्वांचा समावेश आता सिनेट सदस्य म्हणून होऊ शकतो. आणि ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र, याचा काही जणांना त्रास होतो आहे. आणि त्यांच्या पोटदुखीचा हेच कारण आहे हे आता समोर येऊ लागले आहे.
प्रश्न - राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणते नवीन अभ्यासक्रम आपण आखतो आहोत, धोरण काय असेल ?
उदय सामंत - भारतामध्ये महाराष्ट्र हे असे पहिले राज्य आहे. यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसबरोबर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने करार केलेला आहे. या माध्यमातून आम्ही ३९०० नवीन अभ्यासक्रम राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च उच्च आणि तंत्र शिक्षणाचे नवीन धोरण करण्याची समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला आहे. येत्या तीन आठवड्यात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला नवीन धोरण लागू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग अतिशय चांगला विभाग म्हणून पाहिले जाईल.
प्रश्न - परीक्षा पद्धती अथवा शिक्षण पद्धतीत काही बदल करणार का ?
उदय सामंत - परीक्षा पद्धतीत आम्ही अतिशय चांगले बदल केले आहेत. सीईटीच्या परीक्षा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या आहे. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. यापुढेही सर्व परीक्षा या कशा पारदर्शी आणि वेळेवर होतील. त्यांचे निकाल कसे वेळेवर दिले जाते याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार आहे.
प्रश्न - प्राध्यापक भरतीचा प्रश्न प्रलंबित आहे यासंदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे ?
उदय सामंत - प्राध्यापक भरतीच्या संदर्भात प्राध्यापकांच्या अनेक मागण्या आहेत या अनुषंगाने आम्ही पहिली ४०% भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह या झाल्या आहेत अर्थमंत्र्यांच्या सह्या झाले आहे आता युनिट निहाय ही भरती करायची आहे, तो विषय आता लवकरच मार्गी लागेल.
प्रश्न - एसटी संपाबाबत आपण तोडगा काढण्यासाठी मदत केली. मात्र अद्यापही कामगार कामावर परतले नाहीयेत ?उदय सामंत -- एसटी कामगारांचा संप मिटावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि मी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने कधी नव्हे एवढी भरघोस पगारवाढ दिलेली आहे. त्यांच्या अनेक मागण्या मान्य केलेले आहे त्यामुळे कामगारांनी कामावर पुन्हा परतायला हवे. त्यांची दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर होऊन कामावर परतावे असे मी पुन्हा एकदा आवाहन करतो.
प्रश्न - मुंबई बँकेमध्ये महा विकास आघाडीची सत्ता आली मात्र शिवसेनेचे उपाध्यक्ष पद हुकले याबाबत काय सांगाल ?उदय सामंत -- मुंबई बँकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणि याचा आनंद आहे. शिवसेनेचे उपाध्यक्षपद नशिबाची चिठ्ठी काढल्यामुळे हुकले. मात्र, पुढच्या वेळेस नशिबाची चिठ्ठी काढावी लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Last Updated : Jan 15, 2022, 4:18 PM IST