ETV Bharat / city

मिशन बिगेन अगेनमध्ये 14 लाख स्थलांतरित मजूर परतले - कामगारांची नोंदणी बंधनकारक केल्याने माहिती - minister rajesh tope on labourer latest news

राज्यातील जनतेने किती दिवस अजून लॉकडाऊनमध्ये राहायचे यावर उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले, की लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगाव्या लागतील. आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

 rajesh tope on standard labour at mumbai

author img

By

Published : Aug 3, 2020, 11:29 AM IST

मुंबई - कोरोना संसर्ग काळात सर्वाधिक फटका बसलेल्या स्थलांतरित मजूर लॉकडाऊनच्या काळात 50 लाख संख्येने त्यांच्या गावी गेले होते. पण आता मिशन बिगिन अंतर्गत व्यवसाय सुरू झाल्यामुळे परराज्यातील मजूर परत येण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत 13 ते 14 लाख स्थलांतरित मजूर राज्यात परत आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केला होता. पण लॉकडाऊन किती दिवस ठेवायचा हा प्रश्न होता. त्यामुळे हळूहळू सर्व व्यवहार- उद्योग व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास सुरुवात झाली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योग व्यवसाय व ऑफिसची गती वाढवावी लागेल. राज्यात उद्योग व्यवसाय सुरु झाल्यामुळे स्थलांतरित मजुरांची घरवापसी सुरू झाली आहे. दररोज वीस ते तीस हजार स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या राज्यातून महाराष्ट्रात परत येण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यातील जनतेने किती दिवस अजून लॉकडाऊनमध्ये राहायचे यावर उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले, की लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगाव्या लागतील. आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले, की कोरोनाच्या काळात मी स्वतः राज्याच्या 29 जिह्यात फिरून आढावा घेतला. या काळात पोलीस खात्यासह डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ व राज्य सरकारी कर्मचा-यांनी प्रचंड काम केले आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. मुंबईसह राज्यातील अन्य काही शहरांमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मालेगावची परिस्थिती चिंताजनक होती. पण मालेगाव सुधारत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे महाराष्ट्रातील स्थलांतरित मजूर मूळ गावी गेले पण त्यांच्या गावात हाताला काम नसल्यामुळे महाराष्ट्रात परत येण्यास सुरवात झाली आहे. सध्या 25 सर्व्हिस ट्रेन सुरु आहेत. या ट्रेनमधून स्थलांतरित मजूर परत येत आहेत. महाराष्ट्रात परत येणा-या मजुरांची नोंदणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.