मुंबई - कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक साधने मास्क, सॅनिटाझर आणि इतर वस्तू एक सप्टेंबरपासून केंद्र सरकारने देण्याचे बंद केले आहे. मी स्वतः मंत्री जावडेकर यांना भेटून यासंदर्भाची कल्पना दिली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांचे लाडके आहेत. त्यांनी महाराष्ट्रावर उपकार करावेत आणि महिन्याचा 300 कोटी रुपयांचा खर्च वाचावावा, असा टोला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फडणवीसांना लगावला आहे. कोरोना चाचणीचे दर देशांमध्ये कमाल 1200 रुपये करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे पुरवणी मागण्यांवरील चर्चेचे उत्तर देताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा लढा पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या बळावर लढला. आयसीएमआर मार्गदर्शक तत्वानुसार नियंत्रणाचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले होते. राज्यातील ११.५० कोटी लोकांचा विमा काढण्याचे काम राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून केला. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक साधने मास्क, सॅनिटायझर आणि इतर वस्तू एक सप्टेंबरपासून केंद्र सरकारने देण्याचे बंद केले आहे. मी स्वतः मंत्री जावडेकर यांना भेटून या संदर्भाची कल्पना दिली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांचे लाडके आहेत, त्यांनी महाराष्ट्रावर उपकार करावेत आणि महिन्याचा 300 कोटी रुपयांचा खर्च वाचावावा, असे म्हणत राजेश टोपे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.