मुंबई - राज्यातील वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. हाँगकाँग बँक इमारत येथे वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत तनपुरे बोलत होते. यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी संचालक असिम गुप्ता, महानिर्मितीचे खंडारे यांच्यासह पी. के. गंजो, मेनथा, गमरे यांच्यासह तीनही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - राज्यात 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी; काय सुरू, काय बंद?
तनपुरे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या मागण्या, समस्या समजून घेतल्या. याबाबत तीन्ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या. तीनही कंपन्या मिळून 38 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून कोणत्याही कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावरून काढण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात येतील. कामगारांच्या सेवा ज्येष्ठतेला प्राधान्य देण्यात येईल. इतरही मगण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदे
ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियमित मानधन मिळणार आहे. राज्यात कार्यरत असणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियमित मानधन देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.