ETV Bharat / city

Minister Nawab Malik on Chandiwal Commission : मी आयोगाच्या कामकाजाबाबत बोललो नाही, बोलणार नाही - नवाब मलिक - सचिन वाझे

चांदीवाल आयोगा विरोधात कुठलेही वक्तव्य केले नाही तसेच यापुढेही करणार नाही, आयोगाबाबत मला पूर्ण सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नबाव मलिक यांनी ( Minister Nawab Malik on Chandiwal Commission ) दिली. सचिन वाझे व परमबिर सिंह चुकीचे वागत असतील तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे, असे मी आयोगासमोर म्हटले. त्यावर आयोगाने म्हटले की, होय तुमचा अधिकार आहे. त्यानंतर आयोगाने सचिन वाझेचा अर्ज रद्द केला.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Feb 17, 2022, 1:59 PM IST

Updated : Feb 17, 2022, 2:20 PM IST

मुंबई - मी चांदीवाल आयोगाच्या विरोधात कुठलेही वक्तव्य केले नाही तसेच यापुढेही करणार नाही, आयोगाबाबत मला पूर्ण सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नबाव मलिक यांनी ( Minister Nawab Malik on Chandiwal Commission ) दिली.सचिन वाझे व परमबिर सिंह चुकीचे वागत असतील तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे, असे मी आयोगासमोर म्हटले. त्यावर आयोगाने म्हटले की, होय तुमचा अधिकार आहे. त्यानंतर आयोगाने सचिन वाझेचा अर्ज रद्द केला.

बोलताना नवाब मलिक

नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर वाहनात ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह ( Param bir Singh ) तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Sachin Waze ) हेच मास्टरमाइंड ( Mastermind of Antilia Case ) असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर सचिन वाझे यांनी आक्षेप नोंदवत माझी बदनामी होत आहे. त्यामुळे मलिक यांनी याबाबत खुलासा करावा की त्यांनी हे वक्तव्य कोणत्या आधारावर केले आहे, अशी मागणी वाझेने आयोगकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर आयोगाने नवाब मलिक यांना आज हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

त्यानुसार नबाव मलिक हे आपल्या वकिलांसह आयोगसमोर हजर झाले होते. त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले की, सचिन वाझे असतील किंवा परमवीर सिंह ते चुकीचे वागत असतील तर त्याबाबत बोलण्याचा मला अधिकार आहे. यावर आयोगाने होय तो तुमचा अधिकार आहे, असे म्हटले. त्यानंतर मलिक म्हणाले, मी कधीही आयोगाविरोधात बोललो नाही व यापुढेही बोलणार नाही. यानंतर आयोगाने सचिन वाझे यांचा अर्ज रद्द करत नवाब मलिक यांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा - किरीट सोमैयांचा संजय राऊतांवर हल्लाबोल: म्हणाले कागदपत्रांशिवाय आरोप करणाऱ्यांना पुरावा विचारा

Last Updated : Feb 17, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.