मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार आहे, त्यावर भाजपकडून बोट दाखवले जात आहे. परंतु, सत्ताकाळात त्यांनी किती खर्च केला, याकडे लक्ष द्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लगावत भाजपला फटकारले.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसिद्धीसाठी 6 कोटींची तरतूद
सरकारच्या काळात काय केलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारावर ६ कोटी रुपये खर्च होत आहेत असा आरोप होत असून त्यावर नवाब मलिक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारमध्ये काम करत असताना प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण ६ कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे, असेही नवाब मलिक म्हणाले.
केंद्र सरकार व भाजपशासित सरकारे प्रचार व प्रसारासाठी वारेमाप खर्च उधळपट्टी करत आहे. त्या तुलनेत हा खर्च जास्त नाही हे विरोधकांना कळलं पाहिजे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी सुनावले आहे.
हेही वाचा - पत्नीच्या पाठोपाठ पतीचीही आत्महत्या, नवदाम्पत्याच्या मृत्यूने अहमदनगरमध्ये खळबळ