मुंबई - मतदान करताना मी कोणतीही ( Jitendra awhad on rajya sabha voting ) चूक केलेली नाही. भारतीय जनता पक्ष ( Jitendra awhad comment on bjp over rajya sabha ) माझ्या मतदानावर का आक्षेप घेत आहे, हे कळत नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माझी मतपत्रिका मी पक्षाच्या निवडणूक निरीक्षक ( Jitendra awhad on rajya sabha election ) असलेल्यांना दाखवली. मी केलेल्या मतदानात ( Rajya sabha election ) काही चूक आहे असे मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष कारण नसताना केवळ रडीचा डाव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
हेही वाचा - राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रातील विजय 'आनंदाचा क्षण' - देवेंद्र फडणवीस
आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने आपल्या हातून मतदानात कोणतीही चूक झालेली नाही. मी जर आपले मत आपल्या पक्षाला दाखवले नसते तर, माझ्यावर कारवाई झाली असती. मला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असते. माझी राजकीय कारकीर्द बरबाद होऊ शकली असती, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.
भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे आरोप करत आहे त्यात कोणतेही तथ्य नाही. व्हिडिओमध्येही मी मतपत्रिका हातात दिली हे दिसत नाही. केवळ महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
कोणतीही चूक केली नाही - भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मात्र, मतदान करताना आपण कोणतीही चूक केली नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे. केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचेही सुहास कांदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
हेही वाचा - Minister Jayant Patil : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाही - मंत्री जयंत पाटील