ETV Bharat / city

'तेलंगणाच्या मेडीगड्डा धरणाचे पाणी राज्यातील गावात आले असल्यास त्याची गंभीर दखल घेऊ' - मेडीगड्डा धरणा तेलंगणा

मागील काही महिन्यात तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पाणलोट क्षेत्रात नसलेल्या काही गावांचे नुकसान होत आहे.

minister jayant patil
मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Feb 18, 2020, 8:11 PM IST

Updated : Feb 18, 2020, 9:14 PM IST

मुंबई - तेलंगणाच्या मेडीगड्डा धरणातील पाणी राज्यातील काही गावात शिरून त्यामुळे जर जमीन आणि शेतीचे नुकसान झाले असेल, तर त्याची गंभीर दखल घेऊ आणि त्यासाठी तातडीने तेलंगणा सरकारला कळवण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. मागील काही महिन्यात तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पाणलोट क्षेत्रात नसलेल्या काही गावांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

मंत्री जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले की, मेडीगड्डा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८ ते ९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. मात्र, तरीही शहरात पाणी जाण्याचा प्रकार होत असल्याने याविरोधात आमचे आमदार व नेते बाबा आत्राम हे आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, परंतु तेलंगणा राज्याने संपादित केलेली जमीन आहे. त्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त जमिनींचे नुकसान झाले असेल, पाणी आले असेल त्याविषयी तेलंगणा राज्याला कळवण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात आली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

तसेच जेवढी पाण्याची उंची अडवण्याची आवश्यकता होती त्यापेक्षा जास्त पाणी असेल, तर मात्र गंभीर बाब आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही यासाठी देखील तेलंगणा राज्यासोबत त्वरीत चर्चा केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - VIDEO: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या काळातील एकमेव सरसेनापती..

हेही वाचा - बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 403 विद्यार्थी देणार परीक्षा

Last Updated : Feb 18, 2020, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.