ETV Bharat / city

पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार दूर; उपाययोजनांसाठी मुदत वाढीची पाणी पुरवठा मंत्र्यांची घोषणा - मंत्री गुलाबराव पाटील

राज्यात पाणी टंचाई निवारणाच्या कामा करता तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विहिरी विशेष दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत विहित आर्थिक व भौतिक निकषांनुसार मंजूरी देण्यात येत आहे. ३१ मे २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक राहील. जेणेकरुन ही कामे टंचाई कालावधीत उपयोगात आणता येतील, अशा सूचना पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Apr 10, 2021, 4:04 PM IST

मुंबई - राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. ती दूर करण्यासाठी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदत वाढ देण्यात आल्याची घोषणा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासकिय मान्यता देण्याचा कालावधी शिथील करण्याबाबत शासन विचारधीन होते. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या कामांकरिता तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विहिरी विशेष दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत विहित आर्थिक व भौतिक निकषांनुसार मंजूरी देण्यात येत आहे. ३१ मे २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक राहील. जेणेकरुन ही कामे टंचाई कालावधीत उपयोगात आणता येतील, अशा सूचना पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

राज्यात अनेकदा अपुऱ्या पर्जन्यमानामुळे किंवा अन्य कारणांमुळे ग्रामिण तथा नागरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. शासनाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण तथा नागरी क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांकरिता वेळोवेळी स्थायी आदेशाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.