ETV Bharat / city

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; अजित पवारांनी घेतली भेट - Dhananjay Munde health

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका ( Dhananjay Munde Suffered Mild Heart Attack ) आला आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

Dhananjay Munde suffers heart attack
मंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 13, 2022, 6:43 AM IST

Updated : Apr 13, 2022, 11:42 AM IST

मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका ( Dhananjay Munde Suffered Mild Heart Attack ) आला आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे ( Dhananjay Munde health) वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

  • Maharashtra's Social Justice Minister and NCP leader
    Dhananjay Munde admitted to Breach Candy Hospital in Mumbai after he suffered a minor heart attack.

    (File Pic) pic.twitter.com/y5y9k99VW1

    — ANI (@ANI) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कार्यकत्यांची ब्रिच कँडी रुग्णालयात धाव - धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेतेमंडळींनी धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील ब्रिच कँडी रुग्णालयात धाव घेतली.

काळजीचे कारण नाही - आरोग्यमंत्री - मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्यातचे काहीच कारण नाही, त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. पुढील सात दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात डॉ. समाधानी हे नजर ठेऊन आहेत असेही ते म्हणाले.

मुंडेना आरामाचा सल्ला - धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षाचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचे मंत्री आणि वक्ते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. धनंजय मुंडे हे भाजपाच्या पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत परळी मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नेत्यांपैकी ते एक आहेत. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्यांची सध्या प्रकृती ठिक असून त्यांच्या डॉक्टरांनी सात दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

हृदय विकाराचा झटका नाही! - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांना आयसीयूमध्ये ठेवलेले आहे. मी डॉक्टरांना ही भेटलो, फुल बॉडी चेकिंग करायला सांगितले आहे. काल ही बातमी पसरली की त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे पण त्यांना असं काही झटका वगैरे आलेला नाही. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवायला सांगितलेल आहे. आज दुपारी त्यांना विशेष खोलीत शिफ्ट करतील. त्यांना विश्रांतीची फार गरज आहे. काल पार्टी कार्यालयात ते होते, नंतर पवार साहेबांच्या कडे जात असताना अचानक भोवळ आल्यासारखं झालं आणि त्यानंतर काही काळाकरता त्यांना काही सुचले नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा कार्यक्रम आहे. विशेष करून त्यांच्या विभागाचा कार्यक्रम असल्याने त्यांना त्याची चिंता आहे. पण मी त्यांना सांगितल आहे की तुम्ही काही चिंता करू नका आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर चुप्पी! - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल त्यांच्या ठाण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांबद्दल अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही कोणीतरी काहीतरी बोलले म्हणून पुन्हा मला विचारणार. मी त्याला फार महत्त्व देत नाही. माझ्या दृष्टीने आज धनंजयची तब्येत जास्त महत्त्वाची आहे माझा सहकारी आता ऍडमिट आहे मी त्याला भेटायला आलो होतो. इतर प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी देईन काळजी करू नका माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - Raj Thackeray : भविष्यात मोदींनी काही चुकीच केलं तर मी परत बोलेल - राज ठाकरे

Last Updated : Apr 13, 2022, 11:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.