ETV Bharat / city

गोखले, रणौत आणि गुप्तेंसारख्यांना जास्त महत्त्व देऊ नये, छगन भुजबळांचा टोला - बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन

हिंदू आणि मुस्लीम वाद (Hindu Muslim riots) निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Nov 17, 2021, 5:06 PM IST

मुंबई - महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे दुर्लक्षित करून कोणत्याही प्रकारच्या निवडणुका आल्या की हिंदू आणि मुस्लीम वाद (Hindu Muslim riots) निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला. कंगना रणौत (Kangana Ranaut), विक्रम गोखले (Vikram Gokhale), अवधूत गुप्ते (Avdhut Gupte)सारख्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनी (Balasaheb Thackeray death anniversary) भुजबळ यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसार माध्यमशी बोलत होते.

'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 9वा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही हजेरी लावत आहे. छगन भुजबळ यांनी स्मृतीस्थळावरून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. बाळासाहेबांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे. साहेब गेले पण आम्ही साहेबांचे उजवे-डावे हात आहोत. आम्ही जोपर्यंत आहोत, तोपर्यंत महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सरकार काम करून पुढे जात राहील. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे कार्य पुढेही सुरू राहील, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

'हीच त्यांची रणनीती'

कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्याचे अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अशा लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. आता लोकसुद्धा त्यांच्यावर टीका करत असल्याचे भुजबळ म्हणाले. कोणत्याही निवडणुका आल्या, की या लोकांना हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा असतो. त्यातून स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि महागाई (Inflation), बेरोजगारी(Unemployment)सारख्या विषयाकडे दुर्लक्ष करायची ही त्यांची रणनीती आहे, असे भुजबळ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.