ETV Bharat / city

Balasaheb Thorat : आम्ही निवडणुका घेण्यासाठी तयार पण, पावसाची अडचण - बाळासाहेब थोरात

सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) दोन आठवड्यात निवडणुकांबाबत निर्णय घ्यावा ( Local Body Elections ) असे म्हटले आहे. मात्र आता निवडणुका जाहीर केल्यास पावसाची अडचण येऊ शकते आणि राज्य निवडणूक आयोग ( State Election Commission ) याची दखल घेईल असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Throat ) यांनी व्यक्त केला आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : May 5, 2022, 9:13 AM IST

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) राज्यातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा असा असा निर्णय दिला ( Local Body Elections ) आहे. या निर्णयानंतर राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वाचल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील. त्यानंतरच ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Throat ) यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीसाठी तयार पण पावसाची अडचण : मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे कोणाला दोष देण्याचे कारण नाही. या नव्या निर्णयाबाबत मंत्रिमंडळाची बैठक किंवा एकत्रित या विषयावर चर्चा केली जाईल, असेही थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडी निवडणुकांना घाबरत नाही. आम्ही निवडणुकांना तयारच आहोत. मात्र या निवडणुकांसाठी पावसाचा कालावधी असल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि जिथे जास्त पाऊस होतो. तिथे निवडणुका कशा होतील हा प्रश्न आहे, तसेच शेतीचीही कामे सुरू होतात. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग ( State Election Commission ) सुद्धा या बाबींची दखल घेईल, असे थोरात यांनी म्हटले.

आम्ही निवडणुका घेण्यासाठी तयार पण, पावसाची अडचण - बाळासाहेब थोरात

सरकार म्हणून अल्टिमेटम दिलं जाऊ शकत नाही : राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत सरकारला अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकार म्हणून अल्टिमेटम दिलं जाऊ शकत नाही. कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे, यादृष्टीने शासन काम करत आहे. काही जणांना भोंगा नाही तर राजकारण महत्त्वाचं वाटतंय, असा टोला थोरात यांनी राज ठाकरे यांना लगावला. शिर्डीला काकड आरती लाऊडस्पीकरवर झाली नाही. अनेक सण, उत्सव, जागरण गोंधळाचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम असतात याचीही थोरात यांनी आठवण करून दिली. सरकार बॅक फुटवर गेले नाही, कुणी शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर, आम्ही सक्षम आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : Balasaheb Thorat Reaction : फडणवीसांनी आरशासमोर उभे राहावे म्हणजे त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.