मुंबई- गेल्या ५० दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याबाबत आज बैठकीत चर्चा झाल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या प्रकरणावरील न्यायालयाचा २० तारखेचा निर्णय आल्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत अंतिम निर्णय ( action under MESMA on ST employees ) घेतला जाणार असल्याची माहिती परब यांनी दिली आहे.
२० डिसेंबरनंतर मेस्मा अंतर्गत कारवाई-
बैठकीनंतर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab on ST employees Strike ) म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना भरकटवले जात आहे. समितीचा प्राथमिक अहवाल २० तारखेला दाखल केला जाणार आहे. आज झालेल्या बैठकीत त्याबाबत आढावा घेतला आहे. बैठकीत अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे परिवहन मंत्री परब म्हणाले की, या सर्व प्रकरणावरील न्यायालयाचा निकाल २० डिसेंबर रोजी येणार आहे. त्यामुळे त्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहोत.
कामगारांना दिला इशारा-
एसटी कर्मचारी संपाचा तिढा कायम ( unsolved issue of employees strike ) आहे. कामगारांसाठी सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाची एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. राज्य सरकारकडून कर्मचारी बडतर्फ करण्यात येत आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांनी संपातून काढता पाय घेतला नाही. ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
हेही वाचा-ST Workers Strike : संप फोडण्यासाठी महामंडळाची शक्कल; आता कारवाईनंतर बदल्यांचा बडगा
दहा हजारपेक्षा जास्त कर्मचारी निलंबित
आतापर्यत एसटी महामंडळाने दहा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन करताना मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्याचा इशाराही मागील आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता.
हेही वाचा-MSRTC Strike : ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा लावण्याच्या हालचाली, अनिल परब म्हणतात..