ETV Bharat / city

Minister Anil Parab on ST Employees : कर्मचाऱ्यांची बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही - अनिल परब

author img

By

Published : Dec 27, 2021, 5:08 PM IST

विलिनीकरणाचा मुद्दा वगळता सर्व मागण्यांवर सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही संपावर कर्मचारी अडून राहिले आहेत. महामंडळाचे 650 कोटींचे आतापर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील केलेली बडतर्फ कारवाईची मागे घेणार नाही ( Minister Anil Parab on ST Employees ) , अशी ठाम भूमिका परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळचे अध्यक्ष अनिल परब यांनी विधान परिषदेत ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) मांडली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी वारंवार आवाहन केले. विलिनीकरणाचा मुद्दा वगळता सर्व मागण्यांवर सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही संपावर कर्मचारी अडून राहिले आहेत. महामंडळाचे 650 कोटींचे आतापर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील केलेली बडतर्फ कारवाईची मागे घेणार नाही ( Minister Anil Parab on ST Employees ) , अशी ठाम भूमिका परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळचे अध्यक्ष अनिल परब यांनी विधान परिषदेत ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) मांडली. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन आणि वैद्यकीय देयकांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 573 कर्मचाऱ्यांचे 1 कोटी 67 लाख देयके प्रलंबित आहेत. राज्य परिवहन महामंडळाने किती कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाबाबत सरकारची भूमिका काय, असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील ( MLA Ranjitsinh Mohite Patil on ST Employees ) यांनी उपस्थित केला. संपकरी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने बडतर्फची कारवाई केली ( Action Against ST Employees ) आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होता येत नाही, ही कारवाई सरकार मागे घेणार का, असा प्रश्न अधिवेशनात ( Maharashtra Council Winter Session 2021 ) आमदार शशिकांत शिंदे ( MLA Shashikant Shinde on ST Employees ) यांनी विचारला.

बडतर्फ कारवाई मागे नाहीच

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर खुलासा केला. आतापर्यंत एकाही कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत नाही. वेतन देण्यासाठी सुमारे 2 हजार 300 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. पण, ऐन दिवाळीत कर्मचारी अचानक विलीनीकरणाच्या मागण्यासाठी संपावर गेल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निकाल आम्ही मान्य करण्याची ग्वाही देत, कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे, असे सातत्याने आवाहन केले. विलीनीकरण वगळता इतर राज्याच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचे वेतन देत आहोत. तरीही कर्मचारी संपावर ठाम ( ST Workers Strike ) आहेत. त्यामुळे आतापर्यंत एसटीचे सुमारे 650 कोटी बुडाले ( MSRTC Loss 650 Crores ) आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना प्रवासासाठी वाहने उपलब्ध नाहीत. तरीही कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. ज्या कर्मचारी संघटनेने संप पुकारला, त्यांनीही तो मागे घेतला. कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर कर्मचारी संपावर अडून आहेत. अफवांच्या बाजारामुळे एसटी कर्मचारी संप लांबत आहे. परंतु, प्रशासनाने केलेली बडतर्फ कारवाई आता मागे घेणार नाही ( Action Against ST Employees ), असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोना काळात मृत्यू ( ST Employees Death in Corona ) झाला. शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांची मदत केली आहे. पण, जे कर्मचारी निकषात बसले नाहीत, त्यांच्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पाच लाखांची मदत दिल्याचे मंत्री परब यांनी स्पष्ट केले. तसेच संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचे प्रस्तावित आहे. सध्या अशी पाच प्रकरण प्रलंबित आहेत. पण, आर्थिक मदत देण्याचा कोणताही ठराव अद्याप झालेला नाही, असे मंत्री परब यांनी परिषदेत सांगितले.

हे ही वाचा - MH Assembly Winter Session 2021 : नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ; शिवसेनेची कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.