ETV Bharat / city

Amit Deshmukh on Molnupiravir : मोलनूपिरावीर औषधांबाबत आयसीएमआरकडून स्पष्टता नाही - अमित देशमुख - 16 lakh RTPCR kits in Maharashtra

सध्या पॉझिटिव्हीटी रेट 11.46 टक्के ( Maharashtra corona positivity rate 11 Percentage ) आहे. राज्याचा आठवड्याचा सरासरी रेट 8.72 टक्के ( MH corona weekly positivity rate ) आहे. राज्याला 16 लाख आरटीपीसीआर किट्स घ्यावे ( 16 lakh RTPCR kits in Maharashtra ) लागणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले.

अमित देशमुख
अमित देशमुख
author img

By

Published : Jan 6, 2022, 6:11 PM IST

Updated : Jan 6, 2022, 6:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या मोलनूपिरावीर व पिरावीरसारख्या औषधांचा वापर होताना दिसत आहे. आयसीएमआरकडून या औषधांबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असा खुलासा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

गुरुवारी वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. बैठकीत मोलनू पिरावीर या नव्या औषधाबाबत चर्चा केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी माध्यमांनी दिली. तसेच लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा-Chhagan Bhujbal On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पुण्यातून मोदींच्या पुण्याईने निवडून आले.. छगन भुजबळांचा टोला

सध्या पॉझिटिव्हीटी रेट 11.46 टक्के
आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषगांने आज वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील विभागाचे सचिव, संचालक यांच्याकडून वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी आढावा घेतला. दरम्यान, आरोग्य व्यवस्थेला सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. अमित देशमुख म्हणाले, की दुसऱ्या लाटेत जे उपचार देत होतो, तसेच उपचार तिसऱ्या लाटेत दिले जाणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पूर्व तयारी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या विहीत कालावधीत नियमित करण्याची सूचना केल्या आहेत. तसेच सध्या पॉझिटिव्हीटी रेट 11.46 टक्के ( Maharashtra corona positivity rate 11 Percentage ) आहे. राज्याचा आठवड्याचा सरासरी रेट 8.72 टक्के ( MH corona weekly positivity rate ) आहे. राज्याला 16 लाख आरटीपीसीआर किट्स घ्यावे ( 16 lakh RTPCR kits in Maharashtra ) लागणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा-Maharashtra Lockdown : राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार - राजेश टोपे

राज्यात बेड्सची स्थिती काय?

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. 827 बेड पुरुषासाठी राखीव आहेत. त्यापैकी 95 टक्के ऑक्सिजन बेड असणार आहेत. तर 1500 पेडियाट्रिक बेड्स असणार आहेत. 650 आयसीयू बेड आहेत. 8 हजार 227 बेड्पैकी 2 हजार 125 आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनेशन प्लांट बसवण्यात आले आहेत. तिथे ऑक्सिजनचा साठा 75 टक्के राखण्याचे उद्दिष्ट्ये ठेवल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिली. तसेच 250 आरटीपीसीआर लॅब आहे. त्यामध्ये शासकीय लॅब 80 आणि 175 खासगी आहेत. त्यामुळे राज्यात रोज 1 लाख 30 हजार चाचण्या करण्याची क्षमता असेल, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-Devendra Fadnavis on PM Security : पंतप्रधानांचा ताफा अडवणे हे काँग्रेसचे षड्यंत्र- देवेंद्र फडणवीस

रुग्णांची काळजी घेणार -

पुढे अमित देशमुख म्हणाले, की साथ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नवीन विषाणूही जगात आढळत आहे. अनेक डॉक्टरांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार व्यवस्था वाढवली जाईल. नियमांचेदेखील कडक पालन केले जाईल. मिरजमध्ये 100 आणि जेजे रुग्णालयात 60 डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्यास कंत्राट पध्दतीने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड आणि अन्य संघटनांसोबत चर्चा केली. सगळ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची मोहीम येत्या आठ दिवसांत सुरू केली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होईल त्यांना रुग्णालयातच आयसोल्यूशनचा विचार केला आहे. रुग्णांबाबत कोणताही गैरसोय आणि हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे देशमुख म्हणाले.

जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट थांबविल्या नाहीत

जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट थांबवल्याही नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार वेळेनुसार बदल करत असतात. त्याबाबत तज्ज्ञांना माहिती दिली जाते. नवीन व्हेरियंटबाबतचा अहवाल केंद्र आणि आयसीएमआरला पाठवत असतो, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच लॉकडाऊन बाबत तूर्तास तरी निर्णय घेतलेला नाही. रुग्ण स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. सर्व सामान्यांचे जीवन विस्कळीत होऊ नये, याची काळजी घेऊ असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे केंद्रीय राज्यमंत्र्यांची भेट नाही

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीेचे अचानक निमंत्रण मिळाले. काही पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने मी जाऊ शकलो नाही. पण त्यांची वेळ घेईन किंवा दिल्लीला गेल्यावर सविस्तर चर्चा करीन, असे देशमुख म्हणाले.

लॉकडाऊन नकोच

लॉकडाऊन कोणालाही नको आहे. हे सर्व आकड्यांचे गणित आहे. या सूत्रांमध्ये लॉकडाऊन करायची गरज नसेल, तर तसेही करता येईल. पण संख्या वाढली तर काही अडचणी निर्माण होतील. त्यामुळे गरज पडल्यास आवश्यकतेनुसार काही कठोर निर्णय घेण्यात येतील. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे देशमुख म्हणाले.

Last Updated : Jan 6, 2022, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.