मुंबई - मुंबईत आढळलेल्या एक्सई विषाणूचे ( XE New Corona variant ) नमुने एनआयबीएमजीकडे तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Guardian Minister Aditya Thackeray ) यांनी दिली आहे. कोणीही घाबरू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. गेट वे येथील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलेली माहिती राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध उठवण्यात आले आहेत. मास्क लावणे ऐच्छिक करण्यात आले आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असताना आता एक्सई नव्या विषाणूचा रुग्ण मुंबईत आढळला आहे. आरोग्य विभागाची यामुळे चिंता वाढली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण देताना, ज्या रुग्णाला एक्स ईचा संसर्ग झाला होता, तो पूर्णतः बरा आहे. शिवाय संपर्कात आलेल्याचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र खबरदारी घेण्यासाठी संबंधित रुग्णांचे नमुने एनआयबीएमजीकडे तपासणीसाठी पाठवणार आहोत, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
हेही वाचा - Fit Maharashtra : नियमित व्यायाम करा, तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार