ETV Bharat / city

Minister Aditya Thackeray : '...तर मुंबईत किमान गुडघ्यापर्यंत पाणी साचु शकते' - मुंबई महापालिका पावसाळी नियोजन आढावा बैठक

मी खोटं बोलणार नाही. मोठा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर गुडघ्यापर्यंत पाणी साचू शकत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकममंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Environment Minister Aditya Thackeray ) केले आहे. मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामाचा आढावा ( Municipal Corporation  Premonsoon work review meeting ) आदित्य ठाकरे यांनी घेतला.

Minister Aditya Thackeray
Minister Aditya Thackeray
author img

By

Published : May 19, 2022, 4:07 PM IST

Updated : May 19, 2022, 4:40 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये पावसाळापूर्वी कामे सुरु असून ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मी खोटं बोलणार नाही. मोठा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर गुडघ्यापर्यंत पाणी साचू शकत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकममंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Environment Minister Aditya Thackeray ) केले आहे. मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामाचा आढावा ( Municipal Corporation Premonsoon work review meeting ) आदित्य ठाकरे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफीसरांना पुढील दहा दिवस रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना मंत्री आदित्य ठाकरे

'त्या' रस्त्यावर खड्डे : रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात यावर बोलताना, पालिकेव्यतिरिक्त इतर यंत्रणांचेही रस्ते आहेत. मुंबईत गेल्या काही वर्षात रस्त्ये काँक्रीटचे केले जात आहेत. गेल्या काही वर्षात नव्याने जिथे रस्ते झालेत तिथे खड्डे पणार नाही मात्र, जिथे जूने रस्ते आहेत. ज्या ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकास आणि इतर कामे सुरु आहेत, तिथे खड्डे होऊ शकतात. मुंबईतील भूस्खलन होते असे डोंगराळ भाग आहेत. मागील वर्षी तीन ठिकाणी भूस्खलन झाले. त्याठिकाणी सुरक्षा भिंती होत्या. मात्र मोठा पाऊस पडल्याने पाण्याची गती अधिक असल्याने त्या भिंतीही तुटल्या होत्या. डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना धोका आहे. लोकांना स्थलांतरित कशा प्रकारे करता येईल हे पाहिले जात आहे. पालिकेकडून ३० हजार पीएपी घरांसाठी टेंडर काढण्यात आले आहे. दरड कोसळू शकते अशा विभागात काम करता यावीत म्हणून ६२ कोटी रुपयांचा फंड दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

'चांगल्या सूचना स्वीकारू' : भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटकरून आमच्या नालेसफाई कामाच्या पाहणीनंतर पालकमंत्री आढावा घेत असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना भाजपाच्या आरोपाला उत्तर देणार नाही. त्यांनी पाहणी करावी. त्यांच्या पाहणीमधून आरोप सोडून ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या स्वीकारू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

'पटोलेंचे गुडलक कामाला येऊ द्या' : नाना पटोले यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतांना मुंबई तुंबली नाही, असे वक्तव्य केले आहे. यावर बोलताना त्याला आता २५ वर्षे उलटून गेली आहेत. आता ते आमच्या सोबत आहेत. त्यामुळे बघुया त्याचे गुडलक कामाला येऊन मुंबईत कमी पाऊस पडतोय का ते पाहूया, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा - Vishnu Lamba Birdman Pune : हजारो पक्षांची तहान भागवत घरटी उभारणारा 'बर्डमॅन'

Last Updated : May 19, 2022, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.