मुंबई - बाबरी मशीद विध्वंसाला आज २९ वर्ष पूर्ण (Babri Masjid demolition) झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar tweet) यांनी केलेले एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अयोध्येमधील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम, असा मजकूर असणारा बाबरी मशीद पाडतानाचा जुना फोटो नार्वेकरांनी आज सकाळी ट्विट केला. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांनीसुद्धा या ट्विटचा समाचार घेतला आहे.
- — Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
">— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
नार्वेकर यांचे ट्विट चर्चेत -
नार्वेकर यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीची आठवण ताजी केली आहे. शिवसेनेच्या योगदानाची पुन्हा एकदा आठवण नार्वेकर यांनी विरोधकांना करून दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेला 29 वर्ष उलटली आहेत. अयोध्येच्या निर्मितीसाठी भाजपचा हात आहे असा प्रचार सध्या सुरू आहे. मात्र, अशातच शिवसेनेचे योगदान विसरुन चालणार नाही, असा सूचक इशारा नार्वेकरांनी दिला आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्यावर विरोधकांची टीका -
महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुण्यात सिंबॉयसिस संस्थेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे बरोबर आहे, त्यात चुकीचे काय? असे वक्तव्य केले. पण तेवढ्यात नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थांबवत, नार्वेकर कोण आताचे नवीन आहेत का शिवसेनाप्रमुख? असा टोला लगावला. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.