ETV Bharat / city

रेल्वेसाठी धारावीत मजुरांची गर्दी; 'फिजिकल डिस्टन्सिंग'करिता पोलिसांची दमछाक

गेल्या अडीच महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे परप्रांतीय धारावीत अडकलेले आहेत. हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीयाकडचे पैसे आता संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय होत आहे.

रेल्वे प्रवासाकरिता मजुरांची गर्दी
रेल्वे प्रवासाकरिता मजुरांची गर्दी
author img

By

Published : May 28, 2020, 2:03 PM IST

Updated : May 28, 2020, 2:12 PM IST

मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आजही मजुरांची प्रचंड गर्दी दिसत आहे. गावाला जाण्यासाठी हजारो मजूर कुटुंबासह सामान घेऊन धारावीच्या रस्त्यावर आले आहेत. श्रमिक रेल्वेतून जाण्यासाठी हे मजूर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसची सकाळपासून वाट आहेत. धारावीत गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे समजताच पोलिसांनी तेथे येऊन मजुरांना रांगेत उभे केले.

गेल्या अडीच महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे परप्रांतीय धारावीत अडकलेले आहेत. हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीयाकडचे पैसे आता संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे ते आपल्या गावी जाण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने या मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडील नोंदीनुसार मजुरांना रेल्वेतून मूळ राज्यात पाठविण्यात येत आहे. धारावीत हजारो कामगार अडकलेले आहेत.

रेल्वेसाठी धारावीत मजुरांची गर्दी

हेही वाचा-बंदी घातलेल्या कीटकनाशकाच्या संदर्भात पर्याय उभे करू - कृषिमंत्री दादा भुसे

बिहार व मध्य प्रदेश आदी राज्यांत आज श्रमिक रेल्वे जाणार आहेत. त्यामुळे धारावीतून दादर, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेस्थानकांवर जाण्यासाठी बस सोडण्यात आल्या आहेत. या बस आणि एसटीमध्ये बसून रेल्वेस्थानकात जाण्यासाठी मजुरांनी धारावीत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-मुंबईतील 'फॉर्च्युन हॉटेल'च्या आगीवर नियंत्रण; २५ डॉक्टर बचावले

बस आणि एसटी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहता पाहता हजारो मजूर धावतच रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मजुरांना रांग लावण्यास सांगितले. यावेळी मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा-दिल्ली मरकज : 20 देशांच्या 82 नागरिकांवर आरोपपत्रे, तबलिगींचा पासपोर्ट हरवल्याचा कांगावा

बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील आहेत. मजुरांनी तोंडावर मास्क लावले आहेत. मूळगावी जाण्यासाठी पहाटेपासून काहीजणांनी गर्दी केली. तर काहीजणांनी भुकेल्या पोटी आल्याचे सांगितले.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय मजुरांची गर्दी होत आहे. या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात वादंगही झाला.

Last Updated : May 28, 2020, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.