ETV Bharat / city

...असे असेल 'एमएचटी सीईटी'च्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक - राज्य सामायिक परीक्षा

राज्यात यंदा कोरोनाची परिस्थिती असतानाही इंजिनिअरिंग, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, कृषी आदी १३ विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीसाठी राज्यातून ६ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी सर्वाधिक पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंद केली असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

एमएचटी सीईटी
एमएचटी सीईटी
author img

By

Published : Sep 11, 2020, 4:33 AM IST

मुंबई - मागील अनेक महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संक्रमनामुळे अनेक परीक्षा आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन बिघडले होते. मात्र, आता जेईई आणि नीटसारख्या केंद्रीय सामायिक परीक्षांचे आयोजन सुरू झाल्याने राज्य सीईटी सेलने एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळात्रक जाहीर केले आहे.

कोरानोच्या काळातही राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले. या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी मागील काही महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या सुमारे सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन सीईटी सेलने या परीक्षेसाठी अनेक प्रकारचे बदल केले आहेत. पहिल्यांदाच ही परीक्षा तालुकास्तरावरही घेतली जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा आणि त्यासंदर्भातील माहिती, त्यासाठीचे वेळापत्रक आणि नियेाजनही विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून सीईटी सेलने आपल्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात तिकीट वाटपात जसे राजकारण केले तसे बिहारमध्ये करू नका, खडसेंचा फडणवीसांना टोला

उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून एमएचटी-सीईटीच्या परीक्षा ही सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. यंदा या परीक्षांचे नियोजन जुलै महिन्यात घेण्यात येणार होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता देशभरात जेईई आणि नीटच्या परीक्षा होत असल्याने सीईटी सेलने या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) या ग्रुपच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होतील. तर दुसर्‍या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) या ग्रुपमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. पीसीबी ग्रुपची परीक्षा 1,2,4,5,6,7,8,9 या तारखांना तर पीसीएम ग्रुपच्या परीक्षा 12,13,14,15,16,19,20 या तारखांना होणार आहेत.

राज्यात यंदा कोरोनाची परिस्थिती असतानाही इंजिनिअरिंग, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, कृषी आदी १३ विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीसाठी राज्यातून ६ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी सर्वाधिक पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंद केली असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

हेही वाचा - मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.