मुंबई - हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक प्रत्येक मुद्द्यावर आक्रमक होत असताना आता विरोधकांना नवीन मुद्दा हाती सापडलेला आहे. हा मुद्दा आहे स्वच्छतेचा! विधान भवन परिसरामधील अस्वच्छतेवरून भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी प्रश्न उपस्थित ( MH Mihir Kotecha on Assembly Surrounding ) केला आहे.
विधानभवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ( unclean Area of Assembly ) अस्वच्छता आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. दुर्गंधी पसरलेली आहे, असे ट्विट भाजप आमदार मिहिर कोटेचा ( MLA Mihir Kotecha slammed gov ) यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे ट्विट करून अनेक तास लोटले तरीसुद्धा हा कचरा जशाच्या तसा होता. त्यामुळेते अजूनही संतप्त झालेले आहेत.
मुंबई महानगरपालिका नेहमी विरोधकांच्या टार्गेटवर-मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर अनेकदा विधिमंडळामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढण्याच काम विरोधकांकडून करण्यात आलेले आहे. भाजप आमदार मिरकुटे म्हणाले, की खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की मुंबईत आपणाला नेहमी कचरा दिसतो. पण विधानभवनाच्या आवारात कितीतरी घाण आहे. कचरा आहे, दुर्गंधी पसरली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना जर हे सत्ताधारी पक्ष विधानभवन परिसर स्वच्छ ठेऊ शकत नाहीत. तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो? यासंदर्भात मी ट्विट केले आहे. पण अजून त्याची काहीच दखल घेतली नसल्याचे कोटेचा यांनी ( BJP slammed MH gov Assembly cleaning ) म्हटले.
तक्रार करूनही दखल न घेतल्याने नाराजी विधिमंडळात यंदा दोन्ही सभागृहांमध्ये असलेल्या आमदारांची सदस्य संख्या पाहता व त्यांचे स्वीय सहाय्यक, त्याचबरोबर सुरक्षारक्षक यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी विधान भवनामध्ये आहे. तसेच या परिसरामध्ये काही विशेष नामांकित व्यक्तींची सुद्धा ये-जा सुरू असते. अशात त्यांचे जेवण, नाश्तापाणी या सर्व गोष्टी पाहता त्यातून उरल्या जाणाऱ्या पदार्थांचा कचरा होणार हे निश्चितच आहे. पण हा कचरा जमा झाल्यावर त्याची योग्य पद्धतीने रीतसर साफसफाई करण्याचे काम सुद्धा संबंधित यंत्रणेचे आहे. पण, ती यंत्रणा काम करत नसल्याने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु यासंबंधी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केल्याने मिहिर कोटेचा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.