ETV Bharat / city

राज्यपालांकडून आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटीकरिता 1 सप्टेंबरची वेळ; 12 आमदारांचा सुटणार तिढा? - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

ज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांची वेळ मागितली. पुढील चार दिवस राज्यपाल कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने राज्यपालांकडून 1 सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या सरकारला देण्यात आली आहे.

राज्यपाल
राज्यपाल
author img

By

Published : Aug 26, 2021, 10:10 PM IST

मुंबई - राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनात जाऊन भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत नार्वेकर यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटीसाठी एक सप्टेंबरची वेळ दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना आज भेटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, राजभवनाकडून आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटी संदर्भात कोणतीही वेळ देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांची वेळ मागितली. पुढील चार दिवस राज्यपाल कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने राज्यपालांकडून 1 सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या सरकारला देण्यात आली आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर

हेही वाचा-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ऑनड्युटी मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी

12 आमदारांच्या नेमणुकीचा प्रश्न सुटणार?
राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती बाबतचे पत्र महाविकास आघाडी सरकारने आठ महिन्यापूर्वी राज्यपालांना दिले होते. मात्र राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्य सरकारकडून हे सर्व प्रकरण उच्च न्यायालयाकडे नेण्यात आले. उच्च न्यायालयानेदेखील राज्यपालांनी यासंदर्भात निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे असे निरीक्षण नोंदविले होते.

हेही वाचा-मुंडे-खोतकर परिवाराच्या आठवणींना उजाळा, एकमेकांच्या पाठीशी उभ असल्याची दोन्हीकडून ग्वाही

राज्यपाल मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देत नाहीत- नाना पटोले

राज्यपालांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आज राजभवनावर जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देत नसल्याचा थेट आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यपाल हे संविधानीक पद असले तरी, राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेतून केला. नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेच्या काहीवेळानंतरच मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी आघाडी सरकारला एक सप्टेंबरला भेटण्याची वेळ दिली आहे.

हेही वाचा-कोल्हापुरातल्या विद्यार्थिनीला 41 लाखांचे पॅकेज; 'या' कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड

नुकतेच शरद पवारांनी राज्यपालांवर केली होती टीका-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नुकतेच टोला लगावला होता. शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला.. म्हणत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत टोला लगावला होता. मुंबईत शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा टोला राज्यपालांना लगावला होता. 12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्य यांच्या नियुक्तीबाबत आठ महिन्यानंतरही राज्यपालांकडे निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी अनेकदा राज्यपालांवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.