मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरात एका 32 वर्षीय सलीम कुरेशी ( Salim Qureshi ) नामक इसमाकडून 156 ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी हा अमली पदार्थ ( Mephedrone MD drug ) मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील ( International market ) किंमत 23 लाख 40 हजार एवढी आहे. आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti-drug squad ) अटक केली आहे.
आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न- 29 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट कुर्लाच्या मुंबई परिसरात गस्त करीत असताना, त्या ठिकाणी एक इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकास पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पळून जायचं प्रयत्न करत असताना त्यास पथकाने घेराव घालून अटक केली.
आरोपीला अटक - आरोपी सलिमची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक काळया रंगाच्या कॅरीबॅगेमधील १५६ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्या अन्वये इसमाच्या विरोधात भादवी कलम ८ (क) सह २२ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात अमली पदार्थांच्या पुरवठादारांचा शोध घेत आहे.
हेही वाचा - Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी