मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गांवर बोरीवली ते गोरेगाव जलद मार्गावर शनिवारी- रविवारी चार तासाचा रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
- मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०. ४० ते दुपारी ३. ४० वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे आणि कल्याण स्थानकांमधील सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
- हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गवर सकाळी ११. १० वाजतापासून ते दुपारी ४. १० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी / वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेलकरीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी शनिवारी- रविवारी रात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर मध्य रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान बोरीवली ते गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लाॅक घेतला जाणार नाही.