ETV Bharat / city

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 21 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

local
local
author img

By

Published : Feb 19, 2021, 7:19 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 21 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानाकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये मेगाब्लॉक असणार आहे.

मुख्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्‍या डाऊन जलद सेवा डाऊन धीम्या मार्गावर वाळविल्या जातील. सायन ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान सर्व स्थानकावर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा पोहोचतील. तर सीएसएमटी येथे आगमन करणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बल रेल्वे मार्ग-

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4. 10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पनवेल/ बेलापूर/ वाशी डाऊन मार्गावरील लोक सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या पनवेल, बेलापूर आणि वाशी लोकल सेवा सुद्धा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक-

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. मात्र हा मेगाब्लॉक वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये घेण्यात आलेला आहे. रविवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यत मेगा ब्लॉकचे काम चालणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी दिवसभर पश्चिम रेल्वे मार्गावर कोणत्याही मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.