मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 28 फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानाकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी- चुनाभट्टी आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्या डाऊन जलद सेवा डाऊन धीम्या मार्गावर वाळवल्या जातील. सायन ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान सर्व स्थानकावर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर अब जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.40 वाजता ते सायंकाळी 4. 40 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पनवेल/ बेलापूर/ वाशी/ वांद्रे गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील लोक सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या पनवेल, बेलापूर, वाशी, वांद्रे आणि गोरेगाव लोकल सेवा सुद्धा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे. याब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचे मुख्य मार्गने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहेत.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10. 15 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत डाऊन जलद मार्गावरील धीम्या मार्गावर लोकल सेवा वळवण्यात येतील तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.