ETV Bharat / city

मुंबई उपनगरीय तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

author img

By

Published : Apr 9, 2021, 7:23 PM IST

रेल्वे मेगाब्लॉक
रेल्वे मेगाब्लॉक

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 11 एप्रिल 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

सीएसएमटी ते विद्याविहार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या स्थानकावर थांबणार नाही त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. मात्र, ब्लॉक काळात सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 दरम्यान वाशी, पनवेल, बेलापूर करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सकाळी10.21 ते सायंकाळी 3.41 वाजेपर्यंत सीएसएमटी करीता सुटणारी सेवा रद्द राहतील. तर या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई दरम्यान दरम्यान डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालवण्यात येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.