ETV Bharat / city

मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती व तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक - मुंबई लोकल लेटेस्ट न्यूज

रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २१ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक
author img

By

Published : Nov 19, 2021, 8:58 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २१ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. प्रवाशांना हार्बर मार्गावरील सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी रविवारी सांताक्रूझ आणि माहीमदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील गाड्या सांताक्रूझ आणि माहीमदरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. तसेच काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.