मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती ( Railway Track Repair ) आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 24 एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या ( Central Railway Megablock ) मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार ( CSMT To Vidyavihar Megablock ) आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक ( Panvel To Washi Megablock ) घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक - मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 वाजून 55 ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. घाटकोपर येथून सकळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावरील रविवारी सकाळी 11.05 ते 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आले आहे. या ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी 10.33 ते 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकरीता सुटणारी/जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. पनवेल, येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी तथा ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यत पनवेल करिता सुटणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
विशेष लोकल सेवा - मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. याशिवाय ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील. तर या ब्लॉक कालावधीत बेलापूर नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसारच धावतील.