ETV Bharat / city

Sunday Mega Block : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

author img

By

Published : Nov 28, 2021, 2:08 AM IST

मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागातील रेल्वे मार्ग कार्यान्वित व देखभाल दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर कऱण्यात आले.

Sunday Mega Block
Sunday Mega Block

ठाणे - मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागातील रेल्वे मार्ग कार्यान्वित व देखभाल दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर कऱण्यात आले.

असे आहे उदयाचे वेळापत्रक -

मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. तर कल्याणहून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या-अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने आगमन होईल तसेच सुटतील.

हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक तर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी ते वांद्रे डाऊन हार्बर लाइन सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी ते वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी-बेलापूर-पनवेल साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे-गोरेगाव साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी गोरेगाव-वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन -

मेगा ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील. तसेच पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान जनसंपर्क विभागने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रक द्वारे केले आहे.

हेही वाचा - Amravati : नारायण राणेंचा सत्ताबदलाचा दाव्यावर मंत्री यशोमती ठाकुरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.