मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग (Central Railway Mumbai Division) रविवार दि. ३१.७.२०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करणार आहेत. त्यासाठी ते आपल्या ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईन विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे मुख्य रेल्वे मार्ग सीएसएमटी ते कल्याण (except CSMT to Kalyan) पर्यन्त मेगा ब्लॉक नसणार. मात्र, इतर मार्गावर मेगाब्लॉक (Mega block on all routes) असेल. अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए.के सिंग (Public Relations Officer AK Singh) यांनी ईटीव्ही भारतला दिली.
ट्रान्स हार्बर लाइन : ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान, अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणार्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
हार्बर लाइन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत सेवा रद्द राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी, अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. असे मध्य रेल्वे महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.
हेही वाचा : Indian on Twitter : भारतीय युजर्स 'या' वेळी करतात ट्विटरचा सर्वाधिक वापर