ETV Bharat / city

विरोधात कोणी नाही मग मोदी, शाह यांना प्रचारसभेत का आणता? शरद पवारांचा सवाल - Sharad Pawar Latest News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

शरद पवार यांची मुंबईतील सभा
author img

By

Published : Oct 16, 2019, 10:50 PM IST

मुंबई - पैलवान तयार आहे, पण विरोधात कोणी नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एका जाहीरसभेत म्हणाले होते. मात्र, हेच मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात प्रचाराला का आणतात. तुमची खुर्ची जाणार म्हणून तुम्ही असे बोलत आहात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ही निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाली त्याचे विषय वेगवेगळे आहेत. शेजारच्या राष्ट्राने अतिरेकी हल्ला केला त्याला देशाने उत्तर दिले ते योग्य आहे. त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला. पण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. इथे वेगळे विषय आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन खर्च कमी झाला. 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यवतमाळ येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेलो तर त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला विचारले तर विहीर खोदली. पाणी नाही लागले कर्ज घेऊन पीक आले नाही. बँकेच कर्ज घेतले अधिकारी आले वसुलीसाठी जप्ती करणार बोलून गेले. तणावाखाली आत्महत्या केली. सरकारने मदत नाही केली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्याचे औद्योगिक धोरण होते. हजारो हाताला काम दिले गेले. भाजप सरकार सत्तेत आले आणि गेल्या 5 वर्षात 50 टक्के कारखाने बंद झाले. जे सुरू आहेत ते एका पाळीत आहेत. भाजपच्या धोरणामुळे महाराष्ट्रची परस्थिती हाताबाहेर जात आहे. कृषी, औद्योगिक सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र 1 नंबर होता. ती स्थिती आता राहिली नाही.

देशात गुन्हे वाढत आहेत. केंद्र सरकार एक अहवाल पुस्तक काढते. चोरी दरोडे बलात्कार यात राज्य 1 नंबर वर आला आहे. राजकर्त्याचे लक्ष नाही. त्यामुळे हे असे होत आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख वेगवेगळे विचार करतात म्हणून प्रशासनावर वचक राहत नाही. मी 52 वर्षे काम केले. प्रशासन यंत्रणेवर आणि सरकारचे नियंत्रण नसेल तर अधोगतीकडे राज्य जाते, तेच आता होत आहे. आता मी अस बोललो तर उद्धव ठाकरे उद्या माझ्यावर टीका करतील. त्यांना त्यांच्या वडिल बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नुकसान होईल असे निर्णय कधी घेतले नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।

पहेलवान तयार आहे पण विरोधात कोणी नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एका जाहीरसभेत म्हणाले होते. मात्र हेच मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात प्रचाराला का आणतात. तुमची खुर्ची जाणार म्हणून तुम्ही असे बोलत आहेत, असा टोला फडवणीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

Body:
ही निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाली त्याचे विषय वेगवेगळे आहेत ल. शेजारच्या राष्ट्राने अतिरेकी हल्ला केला त्याला देशाने उत्तर दिले ते योग्य आहे. त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला. पण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. इथे वेगळे विषय आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन खर्च कमी झाला. 16 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केली. यवतमाळ येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेलो तर त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला विचारलं तर विहीर खोदली. पाणी नाही लागले कर्ज घेऊन पीक आलं नाही. बँकेच कर्ज घेतलं अधिकारी आले वसुली साठी जप्ती करणार बोलून गेले. तणावाखाली आत्महत्या केली. सरकारने मदत नाही केली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्याचे औद्योगिक धोरण होते. हजारो हाताला काम दिलं गेले. भाजप सरकार सत्तेत आले आणि गेल्या 5 वर्षात 50 टक्के कारखाने बंद झाले. जे सुरू आहेत ते एका पाळीत आहेत. भाजपच्या धोरणामुळे महाराष्ट्रची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कृषी, औद्योगिक सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र 1 नंबर होता. ती स्थिती आता राहिली नाही.
देशात गुन्हे वाढत आहेत. केंद्र सरकार एक अहवाल पुस्तक काढते. चोरी दरोडे बलात्कार यात राज्य 1 नंबर वर आला आहे. राजकर्त्याचे लक्ष नाही. त्यामुळे हे अस होत आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख वेगवेगळे विचार करतात म्हणून प्रशासनावर वचक राहत नाही. मी 52 वर्षे काम केलं. प्रशासन यंत्रणेवर आणि सरकारच नियंत्रण नसेल तर अधोगतीकडे राज्य जाते, तेच आता होत आहे. आता मी अस बोललो तर उद्धव ठाकरे उद्या माझ्यावर टीका करतील. त्यांना त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नुकसान होईल असं निर्णय कधी घेतले नाही. असं पवार यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.