मुंबई - डाव्या कडव्या विचारसरणीच्या उग्रवादासंदर्भात समीक्षा तसेच नक्षलग्रस्त भागातील विकास योजना यासंदर्भामध्ये गृहमंत्रालयाने आज रविवार दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीसाठी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलिस महासंचालक संजय पांडे देखील आहेत. सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचून त्यानंतर ते बैठकीच्या स्थळी म्हणजे विज्ञान भवनाकडे रवाना झाले आहेत. ही बैठक दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनकडे रवाना होतील. दुपारी 3.20 वाजता दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईकडे प्रयाण होईल.
![नक्षलवाद प्रभावित राज्यांची बैठक सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13176122_jkgjkg.jpg)
देशामध्ये फोपावत असलेला नक्षलवादाला चिरडण्यासाठी ही महत्त्वाची बैठक मानली जातेय. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या बैठकीतून राज्यामध्ये होत असलेल्या नक्षलवादी कारवाईबाबत चर्चा झाली होती.
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13176122_dehli.jpg)