ETV Bharat / city

खासदार राहुल शेवाळे अन् केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण - Rahul Shewale and Union Minister Anurag Thakur

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुंबई दौऱ्यदरम्यान शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मंत्री महोदयांची सदिच्छा भेट घेतली. माहीम येथील तेंडुलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार शेवाळे यांनी मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

तेंडुलकर सभागृहात आयोजित कार्यक्रम
तेंडुलकर सभागृहात आयोजित कार्यक्रम
author img

By

Published : Sep 18, 2022, 3:43 PM IST

मुंबई - भाजपचे मिशन लोकसभा ४५ या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर असून आज दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार शेवाळे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांचा (Meeting of MP Rahul Shewale and Union Minister Anurag Thakur) हा दौरा पूर्वनियोजित असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. आम्ही आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवणार आहोत. भाजपच्या वतीने सर्व मतदारसंघात सुरू असलेल्या या दौऱ्याचा शिवसेना -भाजपा युतीला फायदाच होईल असही ते म्हणाले आहेत.

दसरा मेळाव्यावरून अजून संभ्रम - शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीने वांद्रा कुर्ला संकुलातील मैदान दिल्याचे पुढे आले आहे. या प्रश्नावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. (Rahul Shewale and Union Minister Anurag Thakur) त्यामुळे वंदनीय हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी नेमका कोणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर व्ह्ययला हवा, हे जनताच ठरवेल. राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्याने अजूनही दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला शिवाजी पार्कचे मैदान खुले असल्याचे अस्पष्टपणे दिसून येत आहे.

विधानसभा लढविण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी भाजपचे मिशन 45 अंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंबरनाथ परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र घेत, त्यांना आगामी निवडणुकांमध्ये येणाऱ्या समस्याही जाणून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभामध्ये १ राष्ट्रवादी, १ मनसे, १ शिंदे गट तर ३ भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे अध्याहून अधिक मतदारसंघ भाजपच्या कब्जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा असून त्यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून लोकसभासह 6 विधानसभा लढविण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष लक्ष घालत असल्याने राजकीय चर्चाला उधाण आले आहे.

दौऱ्याची सुरवात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रवास योजनेच्या दौऱ्याची सुरवात राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतुन करण्यात आली होती. विशेष म्हणजे डोंबिवली कायमच भाजपचा गड राहिला आहे. तर पहिल्याच दिवसाची शिंदे गटाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी जाऊन मंत्री ठाकूर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याहरी केली. मात्र कुठलीही राजकीय चर्चा दोघामध्ये झाली नसल्याचे खुद्द मंत्री ठाकूर यांनी सांगत डॉ . श्रीकांत माझे मित्र आहेत त्या नात्याने मी त्याच्याघरी आल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र तीन दिवसाच्या प्रवासात कुठंही शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकारी मंत्री ठाकूर यांच्या सोबत दिसला नाही.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.