ETV Bharat / city

मराठा आरक्षणाची आगामी रणनीती आखण्यासाठी नेत्यांची मुंबईत बैठक, २५ जानेवारीला होणार सुनावणी - मराठा आरक्षण लेटेस्ट न्यूज

मुंबईतील वडाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ही बैठक झाली. या बैठकीला राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इतर संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस सकल मराठा समाज मुंबई तर्फे सर्व प्रमुख समन्वयकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते.

meeting of Maratha Kranti Morcha begins today in Mumbai

author img

By

Published : Dec 21, 2020, 6:20 AM IST

Updated : Dec 21, 2020, 7:12 AM IST

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत बनत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या २५ जानेवारीला याबाबत सविस्तर सुनावणी होणार आहे. याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी मराठा समाजातील नेत्यांची मुंबई रविवारी राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीला आमदार विनायक मेटे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राजन घाग उपस्थित होते. बैठकीत आरक्षणाची आगामी रणनीती ठरणार असल्याचे समजते.

हेही वाचा - योगायोगाचा १९ डिसेंबर!...एकाच दिवशी भारताने रचली उच्चांकी आणि निचांकी धावसंख्या

मुंबईतील वडाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ही बैठक झाली. या बैठकीला राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इतर संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस सकल मराठा समाज मुंबई तर्फे सर्व प्रमुख समन्वयकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते. मराठा समाजाचे आंदोलन सद्यस्थितीत दिशाहीन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारवर पुन्हा दबाव निर्माण केला नाही, तर २५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सुनावणीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी व मराठा समाजासाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा समाजाला जास्तीत जास्त कसा मिळू शकेल यावर या बैठकीत विचारविनिमय झाला. सकल मराठा समाज, सर्व समन्वयक, विविध संघटना यांना सदरच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Last Updated : Dec 21, 2020, 7:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.