ETV Bharat / city

Medical Waste In Aarey: आरे जंगलात वैद्यकीय कचरा.. रुग्णालयाला मनपाची नोटीस, २०हजारांचा दंड, ईटीव्हीच्या बातमीचा दणका - मुंबई महापालिका रुग्णालय दंड वैद्यकीय कचरा

आदिवासी पाड्यांजवळील जैव वैद्यकीय कचऱ्याच्या Medical Waste In Aarey धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ईटीव्हीने बातमी प्रसिद्ध केली होती. महापालिका आणि जिल्हाधिकारी यांनी त्या बातमीची दखल घेतली व त्या रुग्णालयाला नोटीस देत २०,००० रुपयाचा दंड BMC Fined Hospital For Medical Waste ठोठावला.

Medical Waste In Aarey
Medical Waste In Aarey
author img

By

Published : Sep 28, 2022, 3:25 PM IST

मुंबई: गेली अनेक महिने झाले आरे जंगलामधील आदिवासी पाड्यांजवळ जैव वैद्यकीय कचरा Medical Waste In Aarey दिसून येत होता. हा कचरा जंगलामधील आरे डेयरीच्या कर्मचाऱ्यांसाठी जे छोटेखानी हॉस्पिटल आहे तेथून येत होता. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी तर पोहचतचं होती शिवाय तेथे मानवी वस्ती असल्यामुळे त्यांनाही याचा धोका निर्माण होत होता. ह्या धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ईटीव्हीने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर महापालिका आणि जिल्हाधिकारी यांनी त्या बातमीची दखल घेतली व त्या रुग्णालयाला नोटीस देत २०,००० रुपयाचा दंड BMC Fined Hospital For Medical Waste ठोठावला. जाणून घेऊया या बाबतची माहिती सविस्तरपणे..

आदिवासी पाड्याजवळ टाकलेला होता कचरा : ईटीव्हीच्या टीमने आरे जंगलात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता त्यांना तेथे जैव वैद्यकीय कचरा टाकलेला आढळला. यासंदर्भात आरे डेअरी प्रकल्पातील रुग्णालयाच्या डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी याबाबत जागरूकता दाखवली नाही. आरे जंगलातील २७ पांड्यात अंदाजे १० हजाराच्या आसपास आदिवासी लोकं राहतात. तसेच तेथून केवळ 500 मीटर अंतरावर महापालिकेची शाळा सुद्धा भरते. या वैद्यकीय कचऱ्यामुळे शाळेतील लहान मुले तसेच पाड्यांतील सामान्य आदिवासी नागरिक यांचे आरोग्य धोक्यात येत होते.

बातमीचा परिणाम कचरा हटवला : याबाबत आदिवासी भागातील कार्यकर्ते मोगा यांना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करतांना माहिती दिली. "अनेक महिने झाले आदिवासी पाड्याच्या भागात रुग्नालयाचा कचरा पडलेला होता. त्याठिकाणी शाळेचे मुलं खेळायला येतात. तसेच आजूबाजूला असलेल्या नागरिकांना सुद्धा या कचऱ्याचा धोका होत होता. आम्ही तक्रार केली मात्र तरीही महापालिका किंवा इतर यंत्रणा लक्ष देत नव्हत्या. परवा ईटीव्ही भारत मराठी द्वारा बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेथील कचरा हटवला गेला. सरकारी यंत्रणा अशीच जागरूक आणि नियमित कार्यरत राहिली तर जनतेला त्रास होणार नाही.''

पालिकेने रुग्णालयाला दिली नोटीस आणि ठोठावला दंड : मुंबई महापालिका गोरेगाव पूर्व-दक्षिण प्रभाग सहाय्यक आयुक्त राजेंद्र आकरे यांच्याशी ईटीव्ही भारतने समस्ये बाबत विचारले असता ते म्हणाले, ''आपण आम्हाला बातमीद्वारे कळविल्या नंतर आम्ही त्वरित अभियंते पिंपळे यांना घटनास्थळी पाठविले. ज्या एजन्सीकडे कचरा हटवण्याचे काम दिले आहे त्यांना देखील सूचना दिल्या आहेत की जैव वैद्यकीय कचरा घातक ठरू शकतो. त्यानंतर तात्काळ त्यांनी कचरा हटविला आहे. तसेच संबंधित रुग्णालयाला २००६ च्या नियमानुसार २०,००० रुपये दंड ठोठावला असल्याची देखील नोटीस पाठवली आहे."

रुग्णालयाची बाजू : रुग्णालयातील डॉ. दिनेश पवार यांनी त्यांची भूमिका विशद करताना म्हटले, "आमच्या रुग्णालयात फार रुग्ण येत नाहीत. तसेच आमचा कोणताही कचरा जैव वैद्यकीय स्वरूपाचा नसतो. कदाचित दुसरे कोणी कचरा टाकत असतील. स्थानिकांना त्याची कल्पना नसेल. आम्हाला त्वरित दंड ठोठवला तसे व्हायला नको होते. महापालिकने याबाबत आधी शहानिशा करायला हवी होती."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.