मुंबई - शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकराची धाड ( IT raids on Yashwant Jadhavs home ) पडली आहे. या धाडीमुळे अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. घुसळून-ढवळून जे काही आहे ते बाहेर येऊ दे, नंतरच बोलणे योग्य होईल अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तर मराठा आरक्षणाचा विचार करावा, अशी अपेक्षा महापौरांनी ( Mumbai Mayor on Maratha reservation ) व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची ( IT raids on Shivsena leader home ) धाड पडली आहे. याबाबत बोलताना, महापौर अश्विनी पेडणेकर म्हणाल्या, की अशी धाड मी कधीही पाहिलेली नाही. या केंद्रीय राज्याच्या यंत्रणा ( Kishori Pednekar on central agency ) असतात. त्यांच्या पद्धतीने काम करू देणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. यशवंत जाधव हे शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष ( BMC standing committee chairman ) आहेत. विवरण पात्रता काही त्रुटी राहिल्या असतील तर ते अधिकारी त्याची पाहणी करत असतील. ते सहकार्य करतील, अशी खात्री आहे.
मराठा आरक्षणाचा विचार करा -
मीसुद्धा मराठा समाजातील आहे. आरक्षणाबाबत सर्व बाबी तपासण्यात आल्या असतील. संभाजीराजे उपोषण बसणार असतील तर त्यांना तो लोकशाहीतला अधिकार आहे. केंद्र आणि राज्य सरकार नक्की सकारात्मक विचार विचार करतील. त्यांनी तो सकारात्मक विचार करावा अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे.
अशा ट्विटला महत्त्व देत नाही -
महाविकास आघाडीमधील पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास आपल्या आई-बहिणीला रस्त्यावर चालणे मुश्किल होईल, असे ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. याबाबत बोलताना, महापौर म्हणाल्या, की अशा ट्विटला मी महत्त्व देत नाही. दुही माजवून आपले साधून घ्यायचे हा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही आमचे काम करत राहू, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
हेही वाचा-Ajit Pawar In Pune : अन् अजित पवार संतापले; म्हणाले, मग काय तुरुंगात जाऊ...
१५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
यशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. त्यासोबत यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या मालमत्तांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने या धाडी असल्याचे समजते. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीही चौकशी सुरू असल्याचे समजते.